Wednesday, December 20, 2023

जोकरच्या गझल #1

 तुझ्याकडे पाहून कुठे तो हसलेला

जोकरचा उपहास तुला का खुपलेला


मनोमनी आतला चोर आहे खट्टू 

मनातल्या शिक्षेला नाही मुकलेला 


झोपेच्या सोंगात खुमारी चढलेली

उगा उगा झोपेत चेव खुरपटलेला


सभ्य जगाच्या पडद्याआड जरासे बघ

कोण कोण रानटी खोलवर लपलेला


जोकर खेळत होता पोकर निर्भावे

केवळ त्याला अभाव होता कळलेला 


बाईपण बाईला ठावे पूर्णपणे

बाईचा निजभाव कुणा समरसलेला


-



अनंत ढवळे


-



र्न्यूयॉर्कच्या ब्रायंट पार्क भागात फिरताना एका लहानशा दुकानात एक जोकरच पेंटिंग पाहिलं. हे चित्र पाहून काही शेर सुचले . नंतर लक्षात आलं ह्या स्वतंत्र गझला आहेत - जोकरच्या गझल. 


जोकरच्या गझल

 र्न्यूयॉर्कच्या ब्रायंट पार्क भागात फिरताना एका लहानशा दुकानात एक जोकरच पेंटिंग पाहिलं. हे चित्र पाहून काही शेर सुचले . नंतर लक्षात आलं ह्या स्वतंत्र गझला आहेत - जोकरच्या गझल. 


Tuesday, December 5, 2023

आणखी एक डिसेंबर पोस्ट

 हा ब्लॉग सुरू करून तब्बल सोळा वर्षं झालीयेत. कवितेची वही हे साधारण स्वरूप ठेऊन चालवलेल हे व्यासपीठ  गझल कविता वाचणाऱ्या (मोजक्याच का असेना) अनामिक वाचकांमुळेच सुरु ठेवता आल आहे हे ही खरच.

Thursday, November 30, 2023

1

मी का प्यालो हे मलाच ठाउक नाही 

ही वेला बहुधा तुटलेल्या ताऱ्याची


पाहत बसलो तर थिजून गेली दिठ्ठी

ही बाव एवढी खोल थंड जन्माची


गंतव्य हालते आणि दुरावत जाते

वाटली उगाचच वेळ दुवे जुळण्याची


आतले पुन्हा वैषम्य दाटले फारा

रद्दी चाळत बसलेलो भरकटण्याची 


माझ्यावर येवुन थांबत जाते आहे

गणना गिनती मोजणी लुप्त शब्दाची



अनंत ढवळे

Tuesday, October 31, 2023

2

 साठोत्तऱ्यांनी बरबाद केली लय

महानगऱ्यांनी बिघडवली कविता
गझलवाले बसलेत दात कोरत
**
सार्वत्रिक बोगसपणात उगाचच
टिमटिमते आहे
तुझ्या कवितांची टिमटिम दिवटी
**
सर्वदूर गर्दीत आपण
एलोरा कोरणाऱ्या अज्ञात हातांनी
लिहितो आहोत निर्रथकाच्या गझला
**
आजवर काय केल ?
काहीही न करण्यातली
मौज अनुभवली
**
लिहू म्हणता लिहवत नाही
बनू म्हणता बनवत नाही
ही कृती अशक्यतम शक्यतांची
-
अनंत ढवळे

Monday, October 30, 2023

Friday, October 13, 2023

1

अर्जित भाषेत लिहिण हे आपल्या मेंदूची/ विचार करण्याच्या पध्दतीची नव्याने जडणघडण करण्यासारख आहे. प्रत्येक भाषेचा एक ठाशीव स्वभाव असतो; वक्तृत्वाची वेगवेगळी वळणे असतात. ही वळणे नीट अंगिकारता आली तरच ते लेखन नैसर्गिक वाटत.

Tuesday, October 3, 2023

उर्दू

 माझी गझल लेखनाची सुरूवात झाली ती उर्दूतून. “सोचता हूं किधर चली है हयात” अशी एक कच्ची पक्की गझल आजकल उर्दूत छापून आली होती. कुठल्याही माध्यमावर प्रकाशित झालेली ती बहुतेक माझी पहिलीच कविता असावी. नंतर तुफैल यांच्या हिंदी मासिकातही एखादी गझल छापून आल्याच आठवत. हे मासिक तेंव्हा चांगलच लोकप्रिय होत. उर्दूच्या परंपरेचा मान ठेवून मी गझलांमधून तखल्लुस देखील उपयोजित करायचो. औरंगाबादेतली बरीचशी उर्दू मंडळी मला आजही या उपनावाने संबोधतात! नंतर मराठीत गझललेखनाच्या आणि प्रयोगांच्या शक्यता अधिक आहेत हे जाणवल्यान पूर्णतः मराठी गझलेत रमलो.

असो, हे सगळ पाल्हाळ लावायच कारण म्हणजे गेल्या वर्षभरात पुन्हा उर्दूत लिहिण सुरू केल आहे. त्यातल काही इथे उर्दू आणि देवनागरी दोन्हीत पोस्ट करतो आहे,

उर्दू लेखनाकडे दुर्लक्ष करू नये अस वाटण्यामागे ज्या दोन मोठ्या माणसांचा विचार आहे त्यांचा उल्लेखही क्रमप्राप्त ठरतो - ते म्हणजे अस्लम मिर्झा आणि फारूक शमीम! फेसबुकमुळे या थोरामोठ्यांशी संपर्कात राहता आलं ही आनंदाची गोष्ट आहे.


Thursday, September 28, 2023

An Urdu Ghazal


رات آنکھوں میں رہیں  بیداریاں 

دم بہ دم آٹکھیلتی بے چینیاں


रात आँखों में रहीं बेदारियाँ 

दम -ब -दम अटखेलती बेचैनियां 


غم کی  بے عنواں لکیروں کی طرح

بنتی گرتی موج کی کلکاریاں


ग़म की बेउनवां लकीरों की तरह 

बनती गिरती मौज की किलकारियाँ 


راہ چلتے ہم کہاں تک آ گئے 

ہو گئیں بوجھل گھنی   آبادیاں 


राह चलते हम कहाँ तक आ गए 

हो गयीं बोझल घनी आबादियाँ 


یوں گزر سکتے ہیں اپنے روزو شب 

کچھ سکوتِ ناز کچھ تنہاییاں 


यूँ गुज़र सकते हैं अपने रोज़ो-शब 

कुछ सुकुते नाज़ कुछ तन्हाईयाँ 


بے حس و بے صوت تھا جنگل خموش 

نا گہان چلنے لگیں پروائیاں


बे-हिसो बे-सौत था जंगल ख़मोश 

नागहाँ चलने लगीं पुरवाइयाँ 

++

اننت  ڈ'ھولے 

Anant Dhavale
All rights reserved 

#


Saturday, September 16, 2023

1

 एकामागून एक गुरफटत जाणाऱ्या व्यूहांमध्ये

मुक्ततेचे दावे करणारे आपण 

गुंतत जातो आहोत


खऱ्या दुनियेच्या आलोकात

ही आपली असंबध्द अरेषीय चित्रे 

वेड्यावाकड्या वावटळींसारखी 

धुराळून चाललेली आहेत


लहान सहान गोष्टींच्या

उलगडत जाण्याची किंवा

न उलगडण्याची कारणे शोधत जाणारी

उत्तररात्र 

पाळत ठेवून बसली आहे 


सहापैकी एकाही दिशेचा उलगडा होऊ नये

एव्हढे दूर आपण निघून आलो आहोत


आणि फार मागेच विरघळून

गेलेले आहे 

समजेचे मीठ


-


अनंत ढवळे

Thursday, August 31, 2023

गझल

 अशात डोक्यात सुरू असलेली गझल -


सारे* रस्ते थिजून गेलेले

म्लानपण ओघळून गेलेले


अर्थ उमजेल काय स्वप्नाचा

एवढ्यातच पडून गेलेले


आपले वर्तमानही बहुधा

आपल्यातच घडून गेलेले


-


अनंत ढवळे

Saturday, July 15, 2023

Copenhagen Interpretation

एक प्रश्न आहे : असं समजा की एका अरण्यात एक झाड पडतं, पण ते ऐकायला तिथं कुणीच नसतं - ह्या स्थितीमध्ये ते झाड पडण्याचा आवाज (ध्वनी) उत्पन्न होईल की होणार नाही ?

Wednesday, June 14, 2023

एक जुनी गझल

ठाव घेतो कोण जन्माचा असा
रंग नाही एकही ज्याचा असा

एक आत्मियताच असते शेवटी
काढला मी अर्थ प्रेमाचा असा

आणते वाहून जे भेटेल ते
वाहण्याचा धर्म पाण्याचा असा

आपल्या सोबत वळावी वाटही
हट्ट आहे चालणाऱ्याचा असा

एकदा जे सोडले ते सोडले
खेद करणे व्यर्थ मोहाचा असा

-

अनंत ढवळे


Saturday, June 3, 2023

1

 काय बघतोस सारखे मागे 

चाललेला पुढे प्रवाहो हा 


वाट संपेल ठीक जगण्याची 

आपल्यातील पंथ चालो हा


-

अंनत ढवळे

Thursday, April 20, 2023

Nobody's War is now available.

Categorizing this book has become hard for me. This book has sci-fi elements, but it is essentially about human behavior! Also, this book is the outcome of the sabbatical I had for a few months this year!

Anyways here's the link :




Sunday, March 26, 2023

असंपादित काम

एक इंग्रजी कादंबरी, इंग्रजी कवितांचा संग्रह, पानगळीची दुसरी आवृत्ती, दुसरा गझल संग्रह, एक मराठी कविता संग्रह, हायकूंचं एक पुस्तक, गझलविषयक लेखांचा संग्रह, 'मीर'ची दुसरी आणि सुधारित आवृत्ती, एक मराठी लघु कादंबरी, उर्दू कवितांचा संग्रह . एवढं सगळं असंपादित काम माझ्याकडे डोळे रोखून पाहत आहे.


पैकी पहिली दोन काम होत आली आहेत. उरलेली या वर्षाच्या शेवटापर्यंत पूर्ण करण्याचा विचार आहे. कामे पूर्ण करण्याचा दबाव स्वतःवर रहावा म्हणून ही पोस्ट.  

Saturday, March 4, 2023

एक नज़्म

 आओ

अपने अपने असरार खोल दें
बन जाएं बादे सबा

ओढ़ लें साँझ का नीलापन

साल हा साल मुंतज़र खड़े पेड़ों का इंतज़ार बन जाएँ


Anant Dhavale

Monday, February 13, 2023

From my WIP novella

 Nuggets from ‘Nobody’s War’

 

 


Liberals, my friend, are bad for business.

 

‘This urge to believe, to know that there is someone among us, a direct conduit to the supreme power, creates religious leaders and then a living being is revered, despite the knowledge that humans, by design, are fallible.

 

Politics and poetry betray logic, Kwaqa.

 

It always takes an outsider. For better or for worse.

 

I do not age. I may die, but only if a system somewhere thinks it’s my time.

 

Men my age die alone, in sleep.

 

One must be in their element, no matter the situation.

 

We are doing the loops here. Overstating the obvious.

 

There is a certain joy that poetry exudes. A sadness too. A beautiful, blue sadness.

 

Trust means nothing to us. It’s a phony construct. We do not deal in such currencies.

 

For some, information is a deterrent. For some, it is a call to action. For us, it is plain and simple leverage.

 

Her face shines in the moonlight like a sculpture. It’s his sculpture, a picture he has imagined and drawn and chiseled in his mind, a ripple of glimmer, a momentary breeze. For him, this togetherness lasts forever, though his mind tells him otherwise.

 


Anant Dhavale 

 

Sunday, February 12, 2023

1

 

ہوش سنبھلنا  طَے تو نَہِیں تھا 
عِشْق میں بچنا طَے تو نَہِیں تھا 

یونہی نَہِیں نکلے تھے آنسو 
گر کے سنبھلنا طَے تو نَہِیں تھا 

کچھ تُم  کَہْتے کچھ ہم سُنتے   
یوں چُپ رہنا  طَے تی نَہِیں تھا 

کہاں گئے سب سنگی ساتھی 
راہ بدلنا طَے تو نَہِیں تھا 

جِن سے دھڑکتے ہیں دِل اپنے 
 اُن سے بِچَھڑْنا طَے تو نَہِیں تھا

--
اَنَنْت  ڈ'ھولے

Anant Dhavale



Saturday, January 14, 2023

उत्तररात्रीचे हायकू- 2

मी पायीच चालत 

गेलो, उर्वरित रस्ता

ह्याची नोंद घेतली जावी


अनंत ढवळे

उत्तररात्रीचे हायकू-1

ऐन मध्यरात्री तरारून 
आलं आहे 
हे लालबुंद-तांबड्या फुलांचं झाड

-

अनंत ढवळे

Sunday, January 8, 2023

1

 दोनों हाथों से थामिए इसको

ज़ीस्त ने आपको पुकारा है  



دونوں ہاتھوں سے تھامئیے اِس کو
زیست نے آپ کو پکارا ہے
Anant Dhavale

Sunday, January 1, 2023

ایک نظم

 مجھ میں کتنے گانو بسے ہیں 

کچھ اجڑے ، آباد گھنے کچھ 

کچھ یونہی ناراض کھڈے ہیں 


بہتے دریا جنگل سنے 

خشق ڈالیاں پھول سنہرے 

دھوپ چھاؤں کے رنگ گھنیرے 


اک دنیا ہے میرے اندر 

میں کیول شاہد ہوں جس میں 


اٹھتی گرتی لہروں کا دکھ 

اگتے ڈھلتے سورج کا غم 

بے زَبان پتوں کا گِرْیہ 

  

اک دنیا ہے میرے اندر 

میں کیول شاہد ہوں جس میں  


مزہ پر ٹھہرے جو آنسو 

دھندلاے انکھوں کے دریا 

دیر تلک پھر بیٹھے گمسم 


ساتھ جہاں تک ٹھہرا ، ٹھہرے 

گلے ملے ،پھر نکلے ہمدم 

اپنا اپنا کرب سنجویے 


اک دنیا تھے میرے اندر 

میں کیول شاہد تھا جس میں 


اننت ڈ'ھولے 

A Ghazal

 A Ghazal .. In heart's alleys, a singular halo of sadness remains  In a little nook of mind, a lingering darkness remains Forgotten sho...