Tuesday, October 3, 2023

उर्दू

 माझी गझल लेखनाची सुरूवात झाली ती उर्दूतून. “सोचता हूं किधर चली है हयात” अशी एक कच्ची पक्की गझल आजकल उर्दूत छापून आली होती. कुठल्याही माध्यमावर प्रकाशित झालेली ती बहुतेक माझी पहिलीच कविता असावी. नंतर तुफैल यांच्या हिंदी मासिकातही एखादी गझल छापून आल्याच आठवत. हे मासिक तेंव्हा चांगलच लोकप्रिय होत. उर्दूच्या परंपरेचा मान ठेवून मी गझलांमधून तखल्लुस देखील उपयोजित करायचो. औरंगाबादेतली बरीचशी उर्दू मंडळी मला आजही या उपनावाने संबोधतात! नंतर मराठीत गझललेखनाच्या आणि प्रयोगांच्या शक्यता अधिक आहेत हे जाणवल्यान पूर्णतः मराठी गझलेत रमलो.

असो, हे सगळ पाल्हाळ लावायच कारण म्हणजे गेल्या वर्षभरात पुन्हा उर्दूत लिहिण सुरू केल आहे. त्यातल काही इथे उर्दू आणि देवनागरी दोन्हीत पोस्ट करतो आहे,

उर्दू लेखनाकडे दुर्लक्ष करू नये अस वाटण्यामागे ज्या दोन मोठ्या माणसांचा विचार आहे त्यांचा उल्लेखही क्रमप्राप्त ठरतो - ते म्हणजे अस्लम मिर्झा आणि फारूक शमीम! फेसबुकमुळे या थोरामोठ्यांशी संपर्कात राहता आलं ही आनंदाची गोष्ट आहे.


No comments:

नदी, दिवे, शहर

हे शहर उभारलं गेलं होतं  नदीच्या काठालगत  तिच्या वळणांलगत शहराचे दिवे तरंगतात  नदीच्या निळसर करड्या पाण्यावर अस्ताव्यस्त भिरकावून दिलेल्या त...