Tuesday, December 31, 2019

तुरळक


आवर्त किती उठलेत तुझ्या बघण्याने
असतेस पाहिले जर का आधी थोडे


-

अनंत ढवळे

तुरळक

सद्भावना, अवहेलना, काही नको काही नको
आहे बरी ही धारणा, काही नको, काही नको

-

अनंत ढवळे

Tuesday, December 3, 2019

तुरळक शेर - २

बोलत बसलो किती तरी दिवसांचे साचण
कलू लागले उन्ह, सावल्या मोठ्या झाल्या..



--

अनंत ढवळे

तुरळक शेर - १

जगण्याचे स्तर इतके सगळे
एका जन्मी कळणार किती..



--

अनंत ढवळे

Monday, August 19, 2019

गझल

माझ्यासाठी इतके कर
हे सगळे राडे निस्तर

मी उगाच आशाळभूत
पानांची नुसती थरथर

जगलो मेलो ठीक - ठीक
पालूपद आता आवर

पब्लिकने केल्या नकला
नकलांचे इमले सुंदर

उरल्या सुरल्या ह्या गोष्टी
काळावर आप्ली मोहर

दूर- दूर वाजत जाते
कोणाची लोभस झांजर



अनंत ढवळे

















Sunday, July 7, 2019

1

हसण्यात तुझ्या संभ्रम संभ्रम वेल्हाळी गा
माझ्यात उभे घनबन अवघे धुंडाळी गा


माणूस जसा वैराण बरड काटेराची
आभाळ जसे दो-दिवसांची कागाळी गा


चालला उतू हा काळ असा चौबाजूंनी
वार्‍यात कागदी जीव तुझा सांभाळी गा..


--

अनंत ढवळे     

Saturday, May 18, 2019

काळ

मी काळात डोकावून पाहतो आहे
काळ अभाव आहे,
विचार आहे,
पाणी आहे

पाणी एक न उलगडलेलं
कोडं आहे

काळ
सुरूंग आहे


काळ
लाकडी खोक्यातल्या टीव्हीसारखा
वेडीवाकडी चित्रे फेकीत जातो आहे

--

अनंत ढवळे

Sunday, February 24, 2019

दिलासा

थोडासा दिलासा शोधण्याच्या प्रयत्नातमी खूपच वाहावून गेलोघुम्म  वारा-वावधनाच्या  रात्रीत
दारूत गुरफटलेला रस्तासरळ सरळ रेषेत जात असतानातिच्या डोळ्यांचीनवल नवल गोलाईआणि केसांमधलली ओलजी बहुतेक प्रेम असावीइतर कुठल्याही गोष्टीपेक्षा
थोडीशी अस्वस्थता कमी करून गेलीधुम्म वारा- वावधनाच्या रात्रीत
-अनंत ढवळे

Thursday, January 31, 2019

1

पुन्हा उरलेच वैयर्थ्यातले दुख
किती वैराण हे भानातले दुख

तुझे असणे न असणे, व्यक्त होणे
थबकले साचल्या पाण्यातले दुख   

उकलणे आपल्यातच आपल्याशी
किती गुंतून ह्या धंद्यातले दुख

प्रदीर्घातील रस्ते एकटयाचे
मुके सोबत दर्‍याखोर्‍यातले दुख

मिसळले आपल्या रक्तात किंवा
उभे ओथंबल्या झाडातले दुख

   -

अनंत ढवळे

Friday, January 25, 2019

तीन शेर

तुझे असणे न असणे, व्यक्त होणे
थबकले साचल्या पाण्यातले दुख

प्रदीर्घातील रस्ते एकटयाचे
मुके सोबत दर्‍याखोर्‍यातले दुख 


अनंत ढवळे





Thursday, January 17, 2019

गझल

फसवलो गेलोत आपण मान्य कर
होउ दे थोडाच झाला खेद तर

जगरहाटी चालली आहेच की
थांबला कोठे धबडगा थेंबभर

फरक इतका, भेटला रस्त्यात तू
एरवी आलेच असते हे हुनर

बोलते आहे मघापासूनचे
वावदुक मोठेच हे झाले शहर

रात्र उत्तर पावसाची झिळमिळे
स्तब्धता कोलाहलाची दूरवर

अनंत ढवळे

Friday, January 4, 2019

2



रात्र उत्तर पावसाची झिळमिळे
शांतता कोलाहलाची कनकभर

--

अनंत  ढवळे

सिनिकल माणसाचं इतिवृत्त

तुम्ही जगता - मौजमजा करता  मग यथावकाश मरता तुमच्या जागी दुसर कुणीतरी येत जग सुरू राहात काहीही बदलत नाही काहीही बदलणार नाही काही बदलण अपेक्षि...