तुम्ही जगता - मौजमजा करता
मग यथावकाश मरता
तुमच्या जागी दुसर कुणीतरी येत
जग सुरू राहात
काहीही बदलत नाही
काहीही बदलणार नाही
काही बदलण अपेक्षितही नाही
मी माझ्या जगण्यातल एक साध अक्षर देखील बदलणार नाही
तशी कुणी संधी दिलीच तर
नसता लिहूच शकलो नसतो
इतक्या सगळ्या
सुखार्थाः सर्वानाम गझला
( किती आहेत अशा ?)
आपण काय आहोत
आपण काय करतो आहोत
आपण नेमके काय उत्खनतो आहोत
हे प्रश्न निरर्थक आहेत
लहानसहान गोष्टींमधून अर्थ शोधण
हीच कदाचित
जगण्यातली मौज आहे
दुनियेच्या मुळाशी आहे
एका लहानग्याचं
निर्मळ हसू
हेच
कदाचित याहून वेगळ काही नाही
काहीच नाही.
..
अनंत ढवळे
No comments:
Post a Comment