Thursday, February 1, 2024

1

आपल्या आत वाहत असते एक नदी

कधी गोदावरी 

कधी पोटामक


आपण म्हणत असतो या नद्यांचे 

सूक्त

किंवा नुसतेच अनुभवत असतो नदीकाठची शून्यता


(शून्यता ही अनुभवण्याची बाब आहे 

समजण्याची नाही)


आपल्या आधी 

कित्येकांनी अनुभवली असेल ही शून्यता

हे नद्यांचं अथक वाहणं

ही निळाईतली अभेद्य विवरं


आपल्या नंतरही 

अशाच वाहतील या नद्या 

असेच अचल उभे राहतील 

हे उत्तुंग सागरमाथे


अशीच गडदत राहील

देशांच्या काल्पनिक रेषा ओलांडून जाणारी 

एखाद्या पहाडाची विराट सावली*


आपण असतो देशकाल आणि इतिहासावर पडलेल्या 

लहान-सहान वळकट्या

पण म्हणून क्षणभरही थांबत नाही 


ही रंगबिरंग देखाव्यांची शोभायात्रा.


-


अनंत ढवळे


पोटामक  - Potomac river

सागरमाथा - Mount everest

*के२ (K2) ह्या शिखराची सावली 

देशकाल - Time and space


No comments:

A Ghazal

 A Ghazal .. In heart's alleys, a singular halo of sadness remains  In a little nook of mind, a lingering darkness remains Forgotten sho...