Wednesday, May 8, 2024

नदी, दिवे, शहर


हे शहर उभारलं गेलं होतं 

नदीच्या काठालगत 

तिच्या वळणांलगत


शहराचे दिवे तरंगतात 

नदीच्या निळसर करड्या पाण्यावर

अस्ताव्यस्त भिरकावून दिलेल्या तारकांसारखे 


खिडकीतून न्ह्याहाळणाऱ्याच्या दृष्टीत

नदी, शहर आणि दिवे

सगळं एकसंधच आहे


एकसंध पूर्णतेसारखं    


-

अनंत ढवळे 


No comments:

A Ghazal

 A Ghazal .. In heart's alleys, a singular halo of sadness remains  In a little nook of mind, a lingering darkness remains Forgotten sho...