Saturday, September 16, 2023

1

 एकामागून एक गुरफटत जाणाऱ्या व्यूहांमध्ये

मुक्ततेचे दावे करणारे आपण 

गुंतत जातो आहोत


खऱ्या दुनियेच्या आलोकात

ही आपली असंबध्द अरेषीय चित्रे 

वेड्यावाकड्या वावटळींसारखी 

धुराळून चाललेली आहेत


लहान सहान गोष्टींच्या

उलगडत जाण्याची किंवा

न उलगडण्याची कारणे शोधत जाणारी

उत्तररात्र 

पाळत ठेवून बसली आहे 


सहापैकी एकाही दिशेचा उलगडा होऊ नये

एव्हढे दूर आपण निघून आलो आहोत


आणि फार मागेच विरघळून

गेलेले आहे 

समजेचे मीठ


-


अनंत ढवळे

No comments:

A Ghazal

 A Ghazal .. In heart's alleys, a singular halo of sadness remains  In a little nook of mind, a lingering darkness remains Forgotten sho...