तुझ्याकडे पाहून कुठे तो हसलेला
जोकरचा उपहास तुला का खुपलेला
मनोमनी आतला चोर आहे खट्टू
मनातल्या शिक्षेला नाही मुकलेला
झोपेच्या सोंगात खुमारी चढलेली
उगा उगा झोपेत चेव खुरपटलेला
सभ्य जगाच्या पडद्याआड जरासे बघ
कोण कोण रानटी खोलवर लपलेला
जोकर खेळत होता पोकर निर्भावे
केवळ त्याला अभाव होता कळलेला
बाईपण बाईला ठावे पूर्णपणे
बाईचा निजभाव कुणा समरसलेला
-
अनंत ढवळे
-
र्न्यूयॉर्कच्या ब्रायंट पार्क भागात फिरताना एका लहानशा दुकानात एक जोकरच पेंटिंग पाहिलं. हे चित्र पाहून काही शेर सुचले . नंतर लक्षात आलं ह्या स्वतंत्र गझला आहेत - जोकरच्या गझल.
No comments:
Post a Comment