अनेक दिवसांपासून सुरू
असलेल्या
निरर्थक बर्फवृष्टीसारखा
मी देखील
निरर्थक बनलो आहे
माझ्या मागून
प्रचंड वेगाने धावत जाते
आहे
दुनियेची अव्याहत
रहाटगाडी
दुनियेला कदाचित
मी दिसत असावा
खिडकीतून
मजल-दरमजल
मागे पडत
जाणारा
एवढं धुधाट
घडत असताना
सभोवती जग कोसळून
पडत असताना
खुर्चीत बसून
व्हिस्की पीत बसणारा
जगण्यातले प्रदीर्घ संदर्भ
आणि बाहेरच्या थंड हवेची
मी सांगड घालू बघतो
आहे
आणि
विसरून गेलेले आहेत
स्थळकाळ
समुदाय
ओळखमूलक गोष्टी
म्हणजे
मौसम बदललेत की
माझे झोपेत बरळणे
वाढले
आहे
?
पहाटेच्या संदिग्ध वेळात
लिहिलेली
ही गोष्ट
कुणाची आहे ?
बर्फावरून
आर पार
उमटून गेलेले पाऊल
कुणाचे आहे
?
--
अनंत ढवळे
No comments:
Post a Comment