अचानक भानावर आल्यागत
धावत सुटलेत
इच्छांचे असंख्य घोडे
मागे पुढे
काचेरी इमारतींचे उत्तुंग वैभव
या वैभवात
सर्वत: प्रवेश निषिद्ध असणारे
तू, मी
अपरिमित इच्छाधार्यांची खडी फौज;
घोडे पाण्याला थांबणार नाहीत
घोडे सावलीला थांबणार नाहीत
घोडे पाळणारेत नाकातोंडातून रक्त येईतो
बाहेर नुकतीच पहाट झालीये
एक लहानसा पक्षी
डहाळीवर बसून गाणे गातो आहे ..
अनंत ढवळे
No comments:
Post a Comment