एक जुनी गझल..
तसा कुठे मी धर्माच्या चौकटीत बसतो
कधी तरी देवळात जातो, पाया पडतो
थेट तुझ्याशी बोलून काही साधत नाही
अनुत्तरित प्रश्नांचा गठ्ठा मागे उरतो
मला पाहिजे काय मला हे कुठे उमगले
मागी बनुनी दिशा दिशा धुंडाळत फिरतो
निर्मळ हसून तू जन्माचे गूढ उकलले
मी व्याख्येच्या वनात अजुनी वणवण फिरतो
-- अनंत ढवळे
1 comment:
क्या बात है...व्याख्येचे वन too good
Post a Comment