Saturday, December 26, 2015

गझल

समजांची खोळ गळुन पडणारी
ओळख एकेक खरी पटणारी

एखाद्या वेडाची जात अशी
रक्तातुन शीळ जशी घुमणारी

जन्माचा डोंब उठत जाणारा
इच्छांची भूक सतत जळणारी

कोणाच्या येण्याची आस तिला
एकाकी वाट कुणी बघणारी

रणरणते आज आपले जीवन
माध्यान्ही धूळ जशी उठणारी..

अनंत ढवळे

No comments:

जुने शेर रिपोस्ट #१

खूप दूरवर आलो आपण असे वाटते वीतभराचा प्रवास निघतो मोजू बघता आसाभवती फिरत राहिलो जन्मोजन्मी तुला समजलो, कुठे समजली तुझी सहजता.. ...