किंचित..
मी इतिहासाचा एखादा सांधा बहुधा
माझ्यावरती गतकाळाचा ताबा बहुधा
तुझियासाठी किंचित रडलो आणि वाटले
या ही कर्तव्यातुन झाली सुटका बहुधा
उगाच क्षणभर सळसळली हिरमुसली झाडे
धुळारल्या पानांवर पडला तारा बहुधा
ही नात्यांची गजबज, हा पाला पाचोळा
मरण असावे निर्जनतेचा वारा बहुधा
दुनियेचा व्यापार पहावा, स्वस्थ बसावे
माझ्यासाठी एकच रस्ता उरला बहुधा
अनंत ढवळे
Marathi Gazals and Poems मराठी गझल आणि कविता Copyright @ Anant Dhavale; Please do not reprint / use in any other media format without proper permission. Author contact - anantdhavale@gmail.com. A blog committed to Marathi Gazal and Poems
Saturday, September 3, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
बरेच
बरेच काही आहे - जमलेले, जमवलेले निरर्थक रूपके देऊन मी वेळ मारून नेऊ शकेन एवढी बेगमी तुम्ही काय आणणार पुढे ते सांगा पिढ्यांचा निरर्थक इत...

-
माझ्या संग्रहातले काही शेर/एक मतला इ. : ++ मी माझ्या या हातांनी पेटवले ज्या वस्त्यांना आलीत पुन्हा भेटाया त्या विस्मरणांची नावे तृष्...
-
समुद्र किनार्यावर बसून लाटांचे बनणे - फुटणे बघणे हा जितका आनंददायी अनुभव आहे तितकाच विलक्षणही. हे चित्र बघणारा अनेक गोष्टींमध्ये हरवून ...
-
'समकालीन गझल' मधला लेख - इथे पुन्हा देतो आहे. : --- गझल : काही नोंदी --- गझलेची व्याख्या काय असावी ह्याबद्दल अनेकदा चर्चा...

1 comment:
सर्वच शेर अप्रतिम झालेत.
आवडली गझल. :)
Post a Comment