Tuesday, October 31, 2023

2

 साठोत्तऱ्यांनी बरबाद केली लय

महानगऱ्यांनी बिघडवली कविता
गझलवाले बसलेत दात कोरत
**
सार्वत्रिक बोगसपणात उगाचच
टिमटिमते आहे
तुझ्या कवितांची टिमटिम दिवटी
**
सर्वदूर गर्दीत आपण
एलोरा कोरणाऱ्या अज्ञात हातांनी
लिहितो आहोत निर्रथकाच्या गझला
**
आजवर काय केल ?
काहीही न करण्यातली
मौज अनुभवली
**
लिहू म्हणता लिहवत नाही
बनू म्हणता बनवत नाही
ही कृती अशक्यतम शक्यतांची
-
अनंत ढवळे

Monday, October 30, 2023

Friday, October 13, 2023

1

अर्जित भाषेत लिहिण हे आपल्या मेंदूची/ विचार करण्याच्या पध्दतीची नव्याने जडणघडण करण्यासारख आहे. प्रत्येक भाषेचा एक ठाशीव स्वभाव असतो; वक्तृत्वाची वेगवेगळी वळणे असतात. ही वळणे नीट अंगिकारता आली तरच ते लेखन नैसर्गिक वाटत.

Tuesday, October 3, 2023

उर्दू

 माझी गझल लेखनाची सुरूवात झाली ती उर्दूतून. “सोचता हूं किधर चली है हयात” अशी एक कच्ची पक्की गझल आजकल उर्दूत छापून आली होती. कुठल्याही माध्यमावर प्रकाशित झालेली ती बहुतेक माझी पहिलीच कविता असावी. नंतर तुफैल यांच्या हिंदी मासिकातही एखादी गझल छापून आल्याच आठवत. हे मासिक तेंव्हा चांगलच लोकप्रिय होत. उर्दूच्या परंपरेचा मान ठेवून मी गझलांमधून तखल्लुस देखील उपयोजित करायचो. औरंगाबादेतली बरीचशी उर्दू मंडळी मला आजही या उपनावाने संबोधतात! नंतर मराठीत गझललेखनाच्या आणि प्रयोगांच्या शक्यता अधिक आहेत हे जाणवल्यान पूर्णतः मराठी गझलेत रमलो.

असो, हे सगळ पाल्हाळ लावायच कारण म्हणजे गेल्या वर्षभरात पुन्हा उर्दूत लिहिण सुरू केल आहे. त्यातल काही इथे उर्दू आणि देवनागरी दोन्हीत पोस्ट करतो आहे,

उर्दू लेखनाकडे दुर्लक्ष करू नये अस वाटण्यामागे ज्या दोन मोठ्या माणसांचा विचार आहे त्यांचा उल्लेखही क्रमप्राप्त ठरतो - ते म्हणजे अस्लम मिर्झा आणि फारूक शमीम! फेसबुकमुळे या थोरामोठ्यांशी संपर्कात राहता आलं ही आनंदाची गोष्ट आहे.


A Ghazal

 A Ghazal .. In heart's alleys, a singular halo of sadness remains  In a little nook of mind, a lingering darkness remains Forgotten sho...