वय सुटत चालल आहे
हातांतून
की आपण चुकलोत आडाखे बांधण्यात
हे कळेतो
निसटून जाईल
पायाखालची माती
मातीखालचा मी
माती माती
आदिमाय
कुठवर कौतूक
सुचेल काय
बाहेर सुरूय
जगबुडीचा पाऊस
नेहमीचा मागमूस
माणूसपणाचा
जेंव्हा फाटत तेंव्हा
भलतच फाटत आभाळ
पण
ह्या स्खलनातही आहे एक ओळखीची लय
कोसळण्याची तऱ्हा
-
अनंत ढवळे
No comments:
Post a Comment