एक जुनी गझल :
दु:ख विसरून गायचे होते
आज मजला हसायचे होते
स्वप्न का भंगले अवेळी ते
रंग अजुनी भरायचे होते
नाव ओठांवरी तुझे आले
प्राण जेंव्हा निघायचे होते
येथ छाया तिथे उन्हे उरली
हेच मागे उरायचे होते
आज तेथे कुणीच का नाही
जेथ घरटे फुलायचे होते
-
अंनत ढवळे
अवांतर : या गझलेच्या जमिनीत अनेक नवे कवी गझल लिहिताना दिसत आहेत. हरकत नाही, पण तसा उल्लेख करणे अपेक्षित आहे.
No comments:
Post a Comment