बऱ्याच उशीराने का होईना, २००६ ते २०२१ अशा प्रदीर्घ कालखंडात लिहिलेल्या गझल संकलित करतो आहे. पन्नास-पंचावन्न गझलांचा हा संग्रह येत्या वर्षभरात कधीतरी येईल, प्रकाशक अद्याप ठरवलेला नाही. सोबत 'मूक अरण्यातली पानगळ' आणि 'मीर' या पुस्तकांच्या दुसऱ्या आवृत्त्या करण्याचा देखील प्रयत्न राहील. पैकी 'मीर'च्या पहिल्या आवृत्तीत प्रुफांच्या खूपच चुका राहून गेल्या होत्या. घाईघाईत लिहून स्वतःच प्रकाशित केल्याने जे सगळे प्रकार होऊ शकतात ते सगळेच या पुस्तकाच्या बाबतीत होऊन गेले होते. आधीच्या कामात काही आणखी भर घालून, मीरच्या काही अधिक गझल समाविष्ट करून पुस्तकाचा पट वाढवण्याचा विचार आहे. बाकी पानगळीची पहिली आवृत्ती येऊन आता सोळा वर्षं उलटली आहेत. या दरम्यान फार काही लिटररी काम होऊ शकलेले नाही ह्याची खंत निश्चीतच आहे . ही कामे पूर्ण होण्यासाठी स्वतःवर थोडा दबाव राहावा म्हणून ही नोंद .
No comments:
Post a Comment