काही तुमच्या झाल्या काही माझ्या झाल्या
काळासोबत भल्या-बुर्या आवृत्त्या झाल्या
बदलत गेलो आपण दुनिया बदलत गेली
नाव - गाव जन्माच्या बाबी उपर्या झाल्या
न्याय द्यायला उतावीळ झालेला जो तो
प्रत्येकाच्या आपआपल्या व्याख्या झाल्या
काय तुझ्या ह्या रसाळ गोष्टींची नवलाई
हातोहात पसरल्या ह्याच्या-त्याच्या झाल्या
बोलत बसलो, किती तरी दिवसांचे साचण
कलू लागले ऊन सावल्या मोठ्या झाल्या
--
कलू लागले ऊन सावल्या मोठ्या झाल्या
--
अनंत ढवळे
No comments:
Post a Comment