निघून जाण्यातली
तर्हा
जपून ठेवलेली
निघून जाणे एरवी निर्बंध
असीम असलेले
त्याला
माहिती नसलेल्या मर्यादा
मागे राहिलेले पडसाद
घरे - दारे - डोंगरांवरून
कच्च्या रस्त्यांवरून
टाकून दिलेल्या
रेल्वे रुळांवरून
तुझी सुविख्यात असलेली गोष्ट
दूरवर उभी आहे
ती देखील
मागे पडत गेलेली
--
अनंत ढवळे
No comments:
Post a Comment