मलाच उत्तरात मागती जशा
दिशा सदैव हाक मारती जशा
निशब्द चालले ॠतू हळूहळू
स्त्रिया निमूट जन्म काढती जशा
फिरून एक सोंग घेतलेय मी
कमीच एरवी करामती जशा
निघून एक-एक शब्द चालला
उगा उभारल्या इबारती जशा
मनात आज खूप प्रश्न दाटले
जुन्या पुण्यातल्या इमारती जशा..
अनं त ढवळे
No comments:
Post a Comment