काही शेर :
मी लिहेन , वाहतील वारे*
ह्या उप्पर अभिलाषा नाही
जमलेही असते लोकांशी
मी प्रयत्न पण केला नाही
जमीन माझी , माझी भाषा
काळ अरे पण माझा नाही
इथवर आलो, हे ही ठीकच
हा प्रवासही सोपा नाही...
अनंत ढवळे
* मी लिहिल्याने वारे वाहतील अशी दर्पोक्ती नसून , वाहणे हा जसा वाऱ्याचा स्वभाव , तसा लिहिणे हा माझा स्वभाव, तितक्याच सहजतेने मी लिहीत जाईल; ह्या गोष्टीमागे इतर कुठलाही हेतू नाही असा अऱ्थ अपेक्षित

1 comment:
प्रवास काळ उत्तम
Post a Comment