Wednesday, March 19, 2025

निब्बान — आता, इथे

हे गप्पा मारणं ह्या गळाभेटी हे मनमुराद
खळखळून हसणं;

हॅलो थँक्यू सॉरी म्हणणं

ह्या अर्धवट ओझरत्या मिठ्या
क्वचित अस्वस्थ हालचालीतनं बोलणं

कधी चेहेऱ्याआड दडून बसणं 

अधून-मधून कवितावाचनांतून भेटणं, नंतरच्या मैफिलींतून
तासंतास कवींच्या गोष्टी आठवून भावविभोर होणं 

नव्या-कोऱ्या वसंतातली प्राजक्ती हवा छातीभर भरून घेणं 

मग त्यानंतरचे अनिवार्य दीर्घसर संथशीळ प्रवास --

ह्यानंतर कायच्या पेचांमधून 

असलेल्या नसलेल्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्नचिन्हे उपस्थित करणं

कधी वस्तूंच्या झगमगाटात हरखून
तर कधी महागड्या गाड्यांच्या सुसाट वेगात गुंगून 

आपआपली प्रभावाशील निब्बानं शोधणं 

एकंदरीत बहुतेक असं काहीसं असतं
हे आतल्या पोकळ्या भरण्याचे 

निर्रथक प्रयास करणं.  

.. 


अनंत ढवळे 


(माझ्या एका इंग्रजी कवितेवर आधारित. अर्थात दोनही कविता आपाल्या ठिकाणी वेगवगेळ्या आहेत)

No comments: