Wednesday, July 27, 2022

गझल

 जगणे विणता येते का 

पाणी धरता येते का 


म्हणतात जिला निद्रा ती 

डोळे मिटता येते का 


आहे माझेच परंतू

माझे म्हणता येते का 


जगण्याची ढब बेढंगी 

जगता जगता येते का 


लय बनण्याआधी पाहू 

निश्चल बनता येते का 


म्हणतोस जगाशी खेटू 

परता निजता येते का..



अनंत ढवळे 

Copyright © Anant Dhavale


No comments:

नदी, दिवे, शहर

हे शहर उभारलं गेलं होतं  नदीच्या काठालगत  तिच्या वळणांलगत शहराचे दिवे तरंगतात  नदीच्या निळसर करड्या पाण्यावर अस्ताव्यस्त भिरकावून दिलेल्या त...