आपण तेंव्हा नादान होतो आणि तो काळही अवघड होता
बरेचदा
मूर्खपणातून आलेली
बेफिकिरी हावी
होत असायची
आणि
शिकारी जसे
नेम धरून टिपत असतात शिकार
तशी आपली
शिकार झालेली असायची
बहुतेक
पातळ्यांवरून
पण
ही बेतल्लख
नादानी
शोभून दिसत असावी त्या दिवसांमध्ये
आणि प्रसिद्ध ठरून गेलेली असावी
ठोकर मारून बेदरकार निघून जाण्याची;
परत मागे न बघण्याची
तर्हा
--
अनंत ढवळे
No comments:
Post a Comment