अर्ध्यात अडकलेल्या कथानकासारखे
हरवलेले लोक
कसल्याशा नशेत भरकटलेले
बेकार आडनिड गल्लीबोळ
धुकट थंड दिवस
डिसेंबरच्या शेवटाची
चिन्हे साकळून आलेली
आपण असतो फक्त बघे
दुरून पाहून
समजेपुरता अर्थ लावणारे
मोडकळलेली उपनगरे
लोखंडी जाळ्यांमधून
बघत असणारी
माणसांचे
संघर्ष
रात्र, सायरनच्या आवाजात
दमून भागून झोपलेली
हॉस्पीटलं,
पिवळ्या लाईटींच्या
संभ्रमात बुडालेली
एखाद-दुसरा
चुकार
साक्षीदार
उगाच बसून असलेला
मध्यरात्रीनंतर
व्हिएतनमीज सूप
पाजणार्या
हॉटेलात
लांबरुंद रस्ते
रटाळ गोष्टींप्रमाणे
निरिच्छ
चालत जाणारे...
__
अनंत ढवळे
हरवलेले लोक
कसल्याशा नशेत भरकटलेले
बेकार आडनिड गल्लीबोळ
धुकट थंड दिवस
डिसेंबरच्या शेवटाची
चिन्हे साकळून आलेली
आपण असतो फक्त बघे
दुरून पाहून
समजेपुरता अर्थ लावणारे
मोडकळलेली उपनगरे
लोखंडी जाळ्यांमधून
बघत असणारी
माणसांचे
संघर्ष
रात्र, सायरनच्या आवाजात
दमून भागून झोपलेली
हॉस्पीटलं,
पिवळ्या लाईटींच्या
संभ्रमात बुडालेली
एखाद-दुसरा
चुकार
साक्षीदार
उगाच बसून असलेला
मध्यरात्रीनंतर
व्हिएतनमीज सूप
पाजणार्या
हॉटेलात
लांबरुंद रस्ते
रटाळ गोष्टींप्रमाणे
निरिच्छ
चालत जाणारे...
__
अनंत ढवळे
No comments:
Post a Comment