बेटावरच्या कविता
१.
हे मिस्टर
यू लुक लॉस्ट
दोन इंग्रजी पोरं मला म्हणाली
यू लुक लॉस्ट
दोन इंग्रजी पोरं मला म्हणाली
मी विचारात पडलो
बहुतेक आपलं हरवलेपण
आजकाल चेहर्यावरही दिसून येऊ लागलंय
बहुतेक आपलं हरवलेपण
आजकाल चेहर्यावरही दिसून येऊ लागलंय
२.
डू यू गो टू द युनी ऑर समथिंग
मी तिला विचारलं
मी तिला विचारलं
नथिंग ऑफ दोज सॉर्टस, आय हॅव अ बेबी
ती म्हणाली
गिव द लेडी वॉटेवर शी वाँटस
मी बार टेंडरला म्हणालो.
मी बार टेंडरला म्हणालो.
३.
हे देशी लोक स्वतःला आजकाल देशी समजत नाहीत
इनिट मेट वगैरे म्हणतात
खणाणा पाउंड्स मोजतात
पुण्या- मुंबईकडं घरं विकत घेतात
वेदर बिदर च्या गप्पा मारतात
इनिट मेट वगैरे म्हणतात
खणाणा पाउंड्स मोजतात
पुण्या- मुंबईकडं घरं विकत घेतात
वेदर बिदर च्या गप्पा मारतात
कडाक्याच्या थंडीत
नाताळाच्या सेलमधल्या
सगळ्यात स्वस्त वस्तू हडपण्यासाठी
सकाळी चार वाजेपासून
दुकानांबाहेर रांगा लावून उभे राहतात
नाताळाच्या सेलमधल्या
सगळ्यात स्वस्त वस्तू हडपण्यासाठी
सकाळी चार वाजेपासून
दुकानांबाहेर रांगा लावून उभे राहतात
अधून-मधून
माणसाला आयुष्यात कुठं थांबायचं
हे कळाल पाहिजे
असंही म्हणतात
माणसाला आयुष्यात कुठं थांबायचं
हे कळाल पाहिजे
असंही म्हणतात
- अनंत ढवळे