आपली थरथरणारी चरित्रे फेकून देऊयात
या पश्चिमेच्या वार्यात
वाळू वाहते आहे तशी वाहत राहील
आपल्या कस्पटांसह विरून जातील
आपले स्पर्श या वाळूवर उमटलेले ;
एरवी हा इतिहासदेखील दखल घेत नाही कुणाची
घरांचे रस्ते पुन्हा एकदा पडताळून पाहावेत
वाटेवरच्या खुणा पक्क्या करून ठेवाव्यात ; घरे वाट बघत बसलीएत देवच जाणे कुणाची
भिंतींवर अपेक्षांचे जुनाट रंग थिजून राहिलेले
हे अनुक्रमहीन प्रवास कुठेतरी संपवले पाहिजेत;
उमजू आले पाहिजेत अर्थे
यदृच्छया रुतून बसल्यात प्रतीक्षा रस्तोरस्ती - एक तर देऊन झालेत आपापले दायभाग किंवा हे,
की काही नव्हतेच देण्याजोगे...
अनंत ढवळे