Sunday, May 16, 2010

मी इतिहासाचा एखादा सांधा बहुधा....

मी इतिहासाचा एखादा सांधा बहुधा
माझ्यावरती गतकाळाचा ताबा बहुधा

तुझियासाठी किंचित रडलो आणि वाटले
या ही कर्तव्यातुन झाली सुटका बहुधा

दुनियेचा व्यापार पहावा, स्वस्थ बसावे
माझ्यासाठी एकच रस्ता उरला बहुधा

अनंत ढवळे

2 comments:

Copyright जयंत कुलकर्णी said...

"दुनियेचा व्यापार पहावा, स्वस्थ बसावे
माझ्यासाठी एकच रस्ता उरला बहुधा"

मस्त !
जयंत कुलकर्णी.
www.omarkhayyaminmarathi.com

प्रणव प्रि. प्र. said...

अनंत,
मस्त मतला व शेर. मला दुसरा शेर फारच आवडला.
तुझियासाठी किंचित रडलो आणि वाटले
या ही कर्तव्यातुन झाली सुटका बहुधा
बाबा गेले माझे तेव्हा असंच काहीसं झालेलं माझं. फारच सुंदर.

जुने शेर रिपोस्ट #१

खूप दूरवर आलो आपण असे वाटते वीतभराचा प्रवास निघतो मोजू बघता आसाभवती फिरत राहिलो जन्मोजन्मी तुला समजलो, कुठे समजली तुझी सहजता.. ...