Tuesday, August 17, 2021

1

 एक मी जगण्यातला देहातला कपड्यांतला

आणि दुसरा नग्न बेफिक्रा कुणी वाऱ्यातला


वाटतो जाईल वायावीण गोंगाटामधे

अर्थ मी जो आणला शोधून वैयर्थ्यातला 


की न गवसावा तुला अथवा मला कुठल्या तऱ्हे

एवढा विस्तीर्ण का संबंध हा दोघांतला


आपले वैराग्य का इतके सहज स्खलनातले

वा असावा छंद हा निव्वळ उतू जाण्यातला 


वाढले आहे बिचारेपण किती श्वासांतले

काय ही तगमग म्हणावी जीव की जाण्यातला


आपल्यासाठीच बनले जग उभे डोळ्यांपुढे

आपल्यापुरता प्रलय डोळे पुन्हा मिटण्यातला 


अनंत ढवळे 


टीपा - 


गेले वर्ष दोन वर्ष अडकून पडलेली गझल. वायावीण ही तुकोबांची संज्ञा आहे - समीर चव्हाणांमुळे मला समजलेली.

A Ghazal

 A Ghazal .. In heart's alleys, a singular halo of sadness remains  In a little nook of mind, a lingering darkness remains Forgotten sho...