मागे एक सुंदर शेर ऐकला :
सद साला दौरे चर्ख था सागर का एक दौर
निकले जो मैकदे से तो दुनिया बदल गई..
कवी - गुस्ताख रामपुरी
खरं तर कवीने इथे नेहमीचीच रूपकं वापरलीएत, म्हणजे सागर, मैकदा ई. पण शेराचा अर्थ मोठा सुंदर आहे. आमच्या प्याल्याची एक फेरी म्हणजे काळाच्या हजार प्रदक्षिणा होत्या. मद्यालयातून बाहेर आलो तेंव्हा कुठे जाणवलं की बाहेरच जग अगदीच बदलून गेलयं. एखाद्या धुंदीमध्ये, एखाद्या आयुष्य ढवळून काढणार्या वेडात माणूस एवढा गुंग होऊन जातो की बाहेरच्या दुनियेत काय सुरू आहे याचे त्याला भानच उरत नाही. या वेडातनं जेंव्हा तो बाहेर पडतो तेंव्हा त्याला जाणवतं की आपण खूप वेगळ्या जगात वावरत होतो.
मानवी स्वभावाचा अत्यंत बारिक पैलू पकडणारा हा शेर मला माझे ज्येष्ठ कवी मित्र अस्लम मिर्झा यांनी ऐकवला होता. मिर्झा साहेब उर्दू आणि मराठी अशा दोन्ही भाषांचे उत्तम जाणकार आहेत. औरंगाबादची उर्दू कविता आणि उर्दूत सामील झालेले मराठी शब्द हे त्यांच्या विशेष आवडीचे तसेच संशोधनाचे विषय आहेत.
त्यातल्या त्यात मराठी कविता हा मिर्झांच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय. माझ्या माहितीप्रमाणे आजवर त्यानी पाचशेहून आधिक मराठी कवितांचे उर्दू अनुवाद केले असून त्यांचा संग्रह प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे.