उत्तररात्र पुन्हा रस्त्यावर एकांडी
कलंडून गेलेली मरणाची हाळी
लांबलांब रुतलेले औदासिन्य जुने
रीतभात सांभाळत उरलेले बाकी
थोर तुझे कारुण्य - एवढे अस्फुट का
बहुताना दरकार अगा फुंकर साधी
एखादाच कुणी जागा नसता येथे
झोप जशी साऱ्यांवर अंताची ग्लानी
हे अरण्य वळणावळणाने गप्प उभे
जाण बनत ओझे रस्ता दाखवणारी
..
अनंत ढवळे
No comments:
Post a Comment