आपलं एलिटिस्ट जगणं
आणि आपली समाजवादी विचारसरणीह्यांचा मेळ बसत नाहीए हे लक्षात येणं,
किंवा -
"प्रश्न एवढा आहे
कोण आपला आहे"
ह्या / अशा सव्वीशीतल्या गझला
अजूनही भेडसावताहेत
हे उमजू येणं.
काही का असेना -
एकंदर जाणिवेत फारसा फरक पडत नाही
आपण असतो कोरडवाहू शेतकरी.
हे शेतकरी असणं,
गुणसूत्रांमधून गोंदवलेलं
निघता निघत नाही.
.
अनंत ढवळे
No comments:
Post a Comment