इथे तिथे नाही । तुझ्याकडे नाही
तुकोबाची वही । गेली कुठे
हरवून गेला । ज्ञानोबाचा खांब
आपला आरंभ । सापडेना
ज्ञान म्हणू ज्याला । अक्षर ती गोष्ट
डोळ्यांपुढे स्पष्ट । दिसेनाशी
सापडले होते । काही क्षणभर
होऊन दुष्कर । निसटले
मौज येते तुला । पळविता लोक
डोई पडे खोक । जमिनीच्या
..
अनंत ढवळे
No comments:
Post a Comment