मन दुखावलेला माणूस
मरू शकतो कुठल्याही व्याधीशिवाय
पत्त्यांच्या घराला हलकीच टिचकी मारल्यासारखा
ही एक सहज नैसर्गिक घटना असू शकते
वाऱ्याची झुळूक येऊन एखादे तांबूस करडे पान
फांदी सोडून निसटून जाण्यासारखी
नंतर कोण काय म्हणेल
किंवा उर्वरित दुनियेचे पुढे काय होईल
ह्या बाबी गौण ठरतात
मन दुखावलेल्या माणसासाठी
हा कल्पांत असतो
त्याच्यापुरता
..
अनंत ढवळे
No comments:
Post a Comment