उरेल मागे म्हटलो थोडे
काही दाखवण्यापुरते
काही वाखाणण्याजोगे
पडदा होता अर्धा उघडा
सूर्य शिरला थेट घरात
थंड तानदानावर थिजून बसला
जिन्यावरून खाली उतरणे
देखील असते अधोगतीच
हे ही समजू लागलंय आजकाल
काय गोंगाटंय आहे रस्ताभर
गाड्यांची नुसती रणरण
उन दुतोंडेपणा करीत कावलेलं
जरा सांभाळून चाललो
तर आलाच मागून उडाणटप्पू
वारा— सोबत चल लेका
मस्ती करूत म्हणायला.
.
अनंत ढवळे
No comments:
Post a Comment