तुझा सल तुझा नाही
वैश्विक आनंद किंवा
दुःखाप्रमाणे
हे जगडव्याळ डिप्रेशन देखील
तुझे नाही
मघाशी भरून आलेले आभाळ
देखील अलिप्तच होते
म्हणजे तुझी क्षणभर जोडली गेलेली नाळ
बुजून गेलेल्या
पांधीसारखी
रुक्ष तृणांकित नोंद
तुझे स्वप्न तुझे नाही
ही चतकोर पांढरी
फुले तुझी नाहीत
ते आक्रांतक काटेही
तुझे नाहीत
तू आहेस हेच
असणे हीच आहे
रंग हरवलेल्या
लाल कन्हेराची
भयमूलक जाण.
.
अनंत ढवळे
No comments:
Post a Comment