Sunday, April 26, 2026

वलये

वलये आहेत 
काही बनलेली 
काही बनवलेली

ऐच्छिक
यादृच्छिक 
नैसर्गिक 

म्हणजे 
समोरच्या डबक्यात मजेशीर 
उडी मारून 
छपाक्कन पाणी उडवणे  
हा भाग केवळ 
ऐच्छिक नसावा  

छातीठोक मीमांसा
एकेकाळी गजबजलेल्या 
आताच्या निमर्नुष्य 
दगडी 

हाटांसारखी.


-
अनंत ढवळे 


 
 


No comments: