Saturday, March 7, 2026

कविता

पुन्हा खिन्नतेचे तळे साचले 
उभारून आली सुनी रिक्तता

अशा दीर्घ रेषेत मी पांगलो 
जसा दूरच्या पाखरांचा थवा 

भुरी तांबडी आर्तता खेचतो 
अथांगातला जोगिया दूरचा 

प्रवासी कुणी शोधतो आसरा 
ऋणारंभ जे व्ह्यायचे व्ह्यायचे 

कलंडून गेलेत निर्धार की 
निरोपातले आर्त हेलावते 

पहाडांमधे एकटी शून्यता 
तुझ्या आत की दुःख माझे जसे 


तुझ्या आत की दुःख माझे जसे 

.
अनंत ढवळे 

No comments: