Thursday, March 26, 2026

अहिर भैरो


१.

घुमटांचे निदिध्यासी
अचल पार करून

वितळून आले आहे
हे एकसंथ आवाजांचे

मानसरोवर. एक निराशय
वाहत जाणारे अगत

दीर्घ.

२.

आतबाहेर हलणाऱ्या
सावल्यांची गतिविहीन

मंडळे. निसटून जाणारे
बरेच काही घेऊन निरभ्र

बसलेले मर्यादरहित 
रिकामे- भक्क आकाश

निरीह एखाद्या तसदी सारखे.

३.

भरून आलेत इतक्या
रेलचेल कणप्रवाहांसोबत

डोळे. अथवा श्वास आणि 
जन्म. हे ध्वनी 

टोकांची अंतरे ओलांडून 
विस्कळून धुंडाळून 

आपले चिन्ह शोधत 
आलेले.

..

अनंत ढवळे

No comments: