Monday, June 15, 2026

लिरिक -1

तुझ्यासोबत जसे गेलेत क्षण 
तसे काहीच नाही 

हवा गाते उगाचच कालची  
आत्मज उदासी

अशा वैराणतेचे रंग 
घ्यावे काय द्यावे 

कुठे सोडून यावे 
मग स्वतःला 

पुन्हा आवाज ते घुमतील, राहो 
तुझ्या हसण्यातले 
जे नम्र काही 

तसे काहीच नाही 


- अनंत ढवळे 

( लिरिक ) 
 

No comments: