गेले काही दिवस विरचनेबद्दल ( Deconstruction )विचार करतो आहे. शब्दांचे रूढ अर्थ , त्या शब्दांमधून वहन होणारे संदेश आणि एकूण भाषेच्या चौकटीचे अर्थवाहित्व किंवा निरर्थकता असे काहीसे मुद्दे आहेत. Deconstruction ला मराठीत विरचना अथवा विखंडन असे म्हणणे
योग्य ठरेल. डिकंस्ट्र्क्शनिजम
असा शब्द वापरात
नाही- त्यामुळे ह्या संज्ञेत
‘वाद' जोडणे योग्य ठरणार नाही
मराठी गझल आणि कविता - अनंत ढवळे / Marathi Gazals and Poems by Anant Dhavavle Copyright © Anant Dhavale; Please do not reprint/use in any other media format without proper permission. Author contact - anantdhavale@gmail.com. A blog committed to Marathi Gazal and Poems
Saturday, February 18, 2017
Thursday, February 16, 2017
Deconstruction / विरचना
भाषेच्या चौकटीच्या बाहेर जाऊन गोष्टी बघणे शक्यनसते, आणि शब्दांना कुठलेही निर्विवाद किंवा निखळ अर्थ नसतात. त्यामुळे बोलली गेलेली प्र त्येकच गोष्ट दुर्बोध आहे - किंवा वृथा बोधक आहे असे म्हणता येते.
Wednesday, February 15, 2017
मनोगत
कपडे खुंटीवर काढून ठेवलेले कधीचे
दारात बूट
घर संयमी म्हाताऱ्यासारखे
एकटक बघत बसलेले
वारा पडलेला
बाहेरची झाडे कमालीची निश्चल
वर अथाह निळेपण
आतल्या केशरी गडद अंधाराशी
वैर घेवून बसलेले
एवढा उशीर झालेला असताना
कुणाला फोन करावा
की निद्रीस्त असतील बहुतेक लोक
सुखासीन
निश्चींततेच्या भोवऱ्यात
ह्या अशा सुनसान रात्रींमध्ये
जिथे सापडत नाही
कुठलाही दुवा
ताडून बघण्यासाठी
आणि दुरावून
मनोज्ञ होऊन बसलेली असतात
आपलीच संथ मनोगते
दुरात हरवलेली एखादी लय शोधीत फिरणाऱ्या फकीरासाखी
अनंत ढवळे
दारात बूट
घर संयमी म्हाताऱ्यासारखे
एकटक बघत बसलेले
वारा पडलेला
बाहेरची झाडे कमालीची निश्चल
वर अथाह निळेपण
आतल्या केशरी गडद अंधाराशी
वैर घेवून बसलेले
एवढा उशीर झालेला असताना
कुणाला फोन करावा
की निद्रीस्त असतील बहुतेक लोक
सुखासीन
निश्चींततेच्या भोवऱ्यात
ह्या अशा सुनसान रात्रींमध्ये
जिथे सापडत नाही
कुठलाही दुवा
ताडून बघण्यासाठी
आणि दुरावून
मनोज्ञ होऊन बसलेली असतात
आपलीच संथ मनोगते
दुरात हरवलेली एखादी लय शोधीत फिरणाऱ्या फकीरासाखी
अनंत ढवळे
Saturday, February 4, 2017
आभार
गेल्या महिन्याभरात ब्लॉगवर चार हजारांहून पेज बघितल्याच्या नोंदी झाल्यात भेट देणार्या सर्व वाचकांचे आभार..
There have been more than four thousand hits on this blog through the last month. A big thank you to all readers !
There have been more than four thousand hits on this blog through the last month. A big thank you to all readers !
Monday, January 9, 2017
मिडनाईट सोनाटा
अर्ध्यात अडकलेल्या कथानकासारखे
हरवलेले लोक
कसल्याशा नशेत भरकटलेले
बेकार आडनिड गल्लीबोळ
धुकट थंड दिवस
डिसेंबरच्या शेवटाची
चिन्हे साकळून आलेली
आपण असतो फक्त बघे
दुरून पाहून
समजेपुरता अर्थ लावणारे
मोडकळलेली उपनगरे
लोखंडी जाळ्यांमधून
बघत असणारी
माणसांचे
संघर्ष
रात्र, सायरनच्या आवाजात
दमून भागून झोपलेली
हॉस्पीटलं,
पिवळ्या लाईटींच्या
संभ्रमात बुडालेली
एखाद-दुसरा
चुकार
साक्षीदार
उगाच बसून असलेला
मध्यरात्रीनंतर
व्हिएतनमीज सूप
पाजणार्या
हॉटेलात
लांबरुंद रस्ते
रटाळ गोष्टींप्रमाणे
निरिच्छ
चालत जाणारे...
__
अनंत ढवळे
हरवलेले लोक
कसल्याशा नशेत भरकटलेले
बेकार आडनिड गल्लीबोळ
धुकट थंड दिवस
डिसेंबरच्या शेवटाची
चिन्हे साकळून आलेली
आपण असतो फक्त बघे
दुरून पाहून
समजेपुरता अर्थ लावणारे
मोडकळलेली उपनगरे
लोखंडी जाळ्यांमधून
बघत असणारी
माणसांचे
संघर्ष
रात्र, सायरनच्या आवाजात
दमून भागून झोपलेली
हॉस्पीटलं,
पिवळ्या लाईटींच्या
संभ्रमात बुडालेली
एखाद-दुसरा
चुकार
साक्षीदार
उगाच बसून असलेला
मध्यरात्रीनंतर
व्हिएतनमीज सूप
पाजणार्या
हॉटेलात
लांबरुंद रस्ते
रटाळ गोष्टींप्रमाणे
निरिच्छ
चालत जाणारे...
__
अनंत ढवळे
Sunday, December 11, 2016
पहाटेचे हायकू
++
पहाटेची नीरवता
तांबडं फुटण्याची
आसमंती वेळ
++
दूरवर काही खूडबूड
सुरू होते आहे
दिवसाची लगबग
++
ह्या नंतर सूरू होतील
कितीतरी गोष्टी
दिवसासोबत कलंडत जातील
--
अनंत ढवळे
डब्लीन (ओहायो)
http://marathihaiku.blogspot.com/
Sunday, November 13, 2016
कादंबरी - 'बेरंग'
सध्या एक कादंबरी लिहितो आहे. पहिला भाग ऐसीअक्षरेच्या दिवाळी अंकात छापून आला आहे, त्याची ही लिंक :
http://aisiakshare.com/node/5587
http://aisiakshare.com/node/5587
Subscribe to:
Posts (Atom)
-
'समकालीन गझल' मधला लेख - इथे पुन्हा देतो आहे. : --- गझल : काही नोंदी --- गझलेची व्याख्या काय असावी ह्याबद्दल अनेकदा चर्चा...
-
१. आहेत दोन नाही-नाही, अनेक उफाळून येणारे वर आपल्या आतून म्हणजे हे नाव-गाव ओळखपाळख निव्वळ चकवा. २. किती मी आलेत वर तवंगून ह्या निरंकुश म...
-
हे वरचे फोटो तसे जुने आहेत. व्हर्जिनियात राहात असताना जरा मोकळीक मिळाली की शॅनंडोआला जाणे हा माझा आवडीचा उपक्रम होता. हजारो एकर पसरलेलं जंगल...