Monday, March 16, 2026

1

ही मिथके वेल्हाळ केशरी
दोघांचे आभाळ केशरी

ओठांवर खुललेले केसर
ही थरथर लडिवाळ केशरी

इच्छांचे पक्षी किलबिलते
पण त्यांचेही भाळ केशरी 

करुणेची उठणारी वलये 
हंबरणारी हाळ केशरी 

मी गातो कोणाची सूक्ते
डोईवर भूपाळ केशरी 

-
अनंत ढवळे 


लिहितो आहे 

Saturday, March 7, 2026

कविता

पुन्हा खिन्नतेचे तळे साचले 
उभारून आली सुनी रिक्तता

अशा दीर्घ रेषेत मी पांगलो 
जसा दूरच्या पाखरांचा थवा 

भुरी तांबडी आर्तता खेचतो 
अथांगातला जोगिया दूरचा 

प्रवासी कुणी शोधतो आसरा 
ऋणारंभ जे व्ह्यायचे व्ह्यायचे 

कलंडून गेलेत निर्धार की 
निरोपातले आर्त हेलावते 

पहाडांमधे एकटी शून्यता 
तुझ्या आत की दुःख माझे जसे 


तुझ्या आत की दुःख माझे जसे 

.
अनंत ढवळे 

Thursday, February 12, 2026

ग़ैन

कुछ ऐैन हुए कुछ ग़ैन हुए 
बस यूं समझो बेचैन हुए 


दो चार जो बीते उसके संग
उन लमहों के कौनैन हुए 


दो चार जो लिखनेवाले थे
आगे पीछे सब बैन हुए 


कुछने नेहरू को गाली दी
बाकी नेहरू के फैन हुए 


देखे क्या क्या फ़ितने मुशफ़िक़
आवाराकुन जब नैन हुए


__
अनंत ढवळे

Wednesday, January 28, 2026

1

पहाडांमधे एकटेपण असे
तुझ्या आत की दु:ख माझे जसे 


-

अनंत ढवळे

Thursday, January 15, 2026

आहेत दोन

१.

आहेत दोन
नाही-नाही, अनेक

उफाळून येणारे वर 
आपल्या आतून

म्हणजे हे नाव-गाव ओळखपाळख 
निव्वळ चकवा.

२.

किती मी आलेत
वर तवंगून 
ह्या निरंकुश 

मंथनातून.

३.

परिणमन आहे
हाताबाहेरचं, बुध्दीच्या कवेत न येणारं

हात वर करून 
मोकळं होण्यातला पळपुटेपणा 

तात्विक  बनून खपवता येतो 
पळपुटेपणाच्या कक्षेत बसवता 

येण्याइतपत.

४.

माणसं अशीच होती
रामकृष्णांच्या काळात

किंबहुना त्या आधी 
आणि 

नंतरही.

५. 

जुन्यांच्या चिंतनावर 
हात मारून

निवांत मिशा पुसताहेत 
तत्वचिंतक बोके

आपणही.

.

अनंत ढवळे