Wednesday, August 20, 2025

पडलीत किती मागे शेते हिरवाळी 
पाहतो जिथे घनदाट पांढरी आहे

जगण्याची सारी घालमेल उरलेली 
माझ्यात पुन्हा येऊन थांबली आहे 

वैतरणा माझ्या खोल अंतरामधली
बुडवेल एकदा मला माहिती आहे  


अनंत ढवळे 

No comments: