एक इंग्रजी कादंबरी, इंग्रजी कवितांचा संग्रह, पानगळीची दुसरी आवृत्ती, दुसरा गझल संग्रह, एक मराठी कविता संग्रह, हायकूंचं एक पुस्तक, गझलविषयक लेखांचा संग्रह, 'मीर'ची दुसरी आणि सुधारित आवृत्ती, एक मराठी लघु कादंबरी, उर्दू कवितांचा संग्रह . एवढं सगळं असंपादित काम माझ्याकडे डोळे रोखून पाहत आहे.
पैकी पहिली दोन काम होत आली आहेत. उरलेली या वर्षाच्या शेवटापर्यंत पूर्ण करण्याचा विचार आहे. कामे पूर्ण करण्याचा दबाव स्वतःवर रहावा म्हणून ही पोस्ट.