Saturday, March 20, 2021

गझल

 इथे तेथे धुमसत्या राहिलेल्या

किती माझ्यात उणिवा राहिलेल्या


मरण नसतोच शेवट मान्य हे पण

जिणे व्यापून दुविधा राहिलेल्या


पुन्हा ही पानगळ या खिन्न वाटा

किती लांबून समद्या राहिलेल्या 


कुठे थांबायचे ठाऊक नाही 

हजारो मैल इच्छा राहिलेल्या 


निबिड भानातले माध्यान्ह वाचत

कवी गेलेत कविता राहिलेल्या


अनंत ढवळे


No comments: