निवारा जन्मभर देऊन गेली
चुकुन रस्त्यात झाडे गवसलेली
कुठे नेतील या वाटा मनाला
तुझ्या डोळ्यात शून्ये उमटलेली
पिवळसर तावदानांवर वयाच्या
थिजुन बसलीत वर्षे ...निसटलेली
कुणाचे स्वप्न प्रत्यक्षात आले
पहाडांवर उन्हे बघ उतरलेली
तुझी सय ठेवतिल ताजी तवानी
तुझ्या पश्चात राने बहरलेली...
अनंत ढवळे..
8.
एक प्रार्थना ओठांमधुनी निघत राहिली
काल रात्रभर तुझी वेदना जळत राहिली
कळूनही त्या सरोवराचे गूढ न कळले
प्रतिबिंबांची वलये नुसती हलत राहिली
जुन्या ऋतूंची साद घेउनी पाउस आला
गेली वर्षे नभातुनी मग गळत राहिली
कुणा न दिसली मूक अरण्यातली पानगळ
त्या दु:खाची गाज दूरवर घुमत राहिली
फुटत राहिल्या आयुष्याच्या बिलोर काचा
दिवस मास वर्षांची शकले पडत राहिली.........
मराठी गझल आणि कविता - अनंत ढवळे / Marathi Gazals and Poems by Anant Dhavavle
Copyright © Anant Dhavale; Please do not reprint/use in any other media format without proper permission. Author contact - anantdhavale@gmail.com. A blog committed to Marathi Gazal and Poems
A non - commercial, literary blog. All rights reserved.
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
आपल्या आत वाहत असते एक नदी कधी गोदावरी कधी पोटामक आपण म्हणत असतो या नद्यांचे सूक्त किंवा नुसतेच अनुभवत असतो नदीकाठची शून्यता (शून्यता ही अ...
-
तुम्ही जगता - मौजमजा करता मग यथावकाश मरता तुमच्या जागी दुसर कुणीतरी येत जग सुरू राहात काहीही बदलत नाही काहीही बदलणार नाही काही बदलण अपेक्षि...
-
मघाचपासुन वाऱ्याची नुसती भणभण त्यात मला गावेना माझे उच्चारण अवसादाचे रंग भरुन गेली दशके खिन्न पिढीचे हसणे सुध्दा निष्कारण इतिहासाचे थोटुक धु...
2 comments:
Apratim, great work. Anant.
pratyek sher lajawab...
Post a Comment