Sunday, November 30, 2025

अनवळखी

गूढ आतले काजळणारे
रोज नवे मन संभवणारे  

अनवळखी आपल्यात कोणी  
आपल्यामध्ये वावरणारे  

प्रत्येकाचे एक उभे जग
प्रत्येकाला वाचवणारे 
 
चोर लपवतो चोरी पण हे
पाणी बेटे उंचवणारे 
    
पांघरले हलकेपण, सुटलो 
बनलो कस्पट भिरभिरणारे

-

अनंत ढवळे