Wednesday, January 3, 2024

1

 हरेक जण विकतो आहे काही ना काही 

मी ग्राहक बनलेलो आहे प्रत्येकाचा


काय करू मी सांग तुझ्या या चतुराईचे 

मला जिथे कंटाळा माझ्या धूर्तपणाचा


नेहमीच असतो आपण का परिघावरती

नेहमीच बोगस का गमतो वेष जगाचा 


-


अनंत ढवळे