मी का प्यालो हे मलाच ठाउक नाही
ही वेला बहुधा तुटलेल्या ताऱ्याची
पाहत बसलो तर थिजून गेली दिठ्ठी
ही बाव एवढी खोल थंड जन्माची
गंतव्य हालते आणि दुरावत जाते
वाटली उगाचच वेळ दुवे जुळण्याची
आतले पुन्हा वैषम्य दाटले फारा
रद्दी चाळत बसलेलो भरकटण्याची
माझ्यावर येवुन थांबत जाते आहे
गणना गिनती मोजणी लुप्त शब्दाची
—
अनंत ढवळे