आवर्तन बनलेले आहे शून्य जसे
दुनियेच्या संघातावर वा बुद्ध उभे
दिसणार्याची महता आहे खूपच पण
पूर्ण बनत जाते आहे न दिसलेले
बोल असंबद्धाची मिळकत खूब ठरो
यंदा करून पाहू म्हणतो जे जमते
स्वप्नामधले स्वप्न खरे नव्हते बहुधा
वाटेवर उरलेले केवळ दोन ठसे
जाग पुरेशी आलेली आहे आता
धरून पाहू सावधतेची अपरूपे...
-
अनंत ढवळे
Marathi Gazals and Poems by Anant Dhavavle Copyright @ Anant Dhavale; Please do not reprint/use in any other media format without proper permission. Author contact - anantdhavale@gmail.com. A blog committed to Marathi Gazal and Poems
Wednesday, February 28, 2018
Sunday, February 11, 2018
1
वेडेपणात
रंग गवसले किती-तरी
थोडे
उजाडताच हरवले किती-तरी
संदर्भहीन
होत चाललेत चेहरे
येतो
विचार लोळ निववले किती-तरी
रेंगाळलो
जराच खिन्नतेमधे तुझ्या
इतक्यात
आरपार बदलले किती-तरी
चल विस्कटून टाक खेळ एकदा
पुन्हा
मग लाव हे पुराण,
बिनसले किती-तरी
माझ्यात
थांबलेत सूर्य शेकडो जसे
माझ्यासमोर
काळ धुमसले किती-तरी
-
अनंत
ढवळे
Thursday, February 1, 2018
माती
माती
--
माती
अंगाखांद्यावर
हातापायांवर
मेंदूच्या खाचखळग्यांत
माती
हवेत, आभाळात, पानांपानांवर
वर्षे झाकोळून
इतिहासाचे ओझे,
हिंसा, करुणा
बांधावरची वैरे
वितुष्टे होऊन
काही एक ओळख देणारी
आणि काढून घेणारी
गोष्ट; जीवितावर पसरलेल्या
अनुत्खनीत सत्याची
चादर बनून
माती माती
आदिमाये
वाहत - वादळत ये
मला गिळून घे
--
अनंत ढवळे
2007
--
माती
अंगाखांद्यावर
हातापायांवर
मेंदूच्या खाचखळग्यांत
माती
हवेत, आभाळात, पानांपानांवर
वर्षे झाकोळून
इतिहासाचे ओझे,
हिंसा, करुणा
बांधावरची वैरे
वितुष्टे होऊन
काही एक ओळख देणारी
आणि काढून घेणारी
गोष्ट; जीवितावर पसरलेल्या
अनुत्खनीत सत्याची
चादर बनून
माती माती
आदिमाये
वाहत - वादळत ये
मला गिळून घे
--
अनंत ढवळे
2007
Subscribe to:
Posts (Atom)
A Ghazal
A Ghazal .. In heart's alleys, a singular halo of sadness remains In a little nook of mind, a lingering darkness remains Forgotten sho...
-
आपल्या आत वाहत असते एक नदी कधी गोदावरी कधी पोटामक आपण म्हणत असतो या नद्यांचे सूक्त किंवा नुसतेच अनुभवत असतो नदीकाठची शून्यता (शून्यता ही अ...
-
हरेक जण विकतो आहे काही ना काही मी ग्राहक बनलेलो आहे प्रत्येकाचा काय करू मी सांग तुझ्या या चतुराईचे मला जिथे कंटाळा माझ्या धूर्तपणाचा नेहम...
-
तुम्ही जगता - मौजमजा करता मग यथावकाश मरता तुमच्या जागी दुसर कुणीतरी येत जग सुरू राहात काहीही बदलत नाही काहीही बदलणार नाही काही बदलण अपेक्षि...